ताज्या घडामोडीमहाराष्ट्र

ब्रेकिंग- शिवसंग्रामचे अध्यक्ष विनायक मेटे यांचे अपघाती निधन

ब्रेकिंग- शिवसंग्रामचे अध्यक्ष विनायक मेटे यांचे अपघाती निधन

शिवसंग्रमानचे नेते विनायक मेटे यांच्या गाडीचा अपघात झाल्याची घटना घडली आहे. खोपली इथल्या बातम बोगद्याजवळ हा अपघात घडला. आज पहाटे साडेपाच वाजता हा अपघात झाला आहे. अपघातामध्ये विनायक मेटे यांना दुखापत झाली आहे.
त्यांच्यावर सध्या पनवेलच्या एमजीएम रुग्णालयात क्रिटीकेयर युनिटमध्ये उपचार सुरू होते.उपचारा दरम्यान त्यांचे निधन झाल्याचे वृत्त हाती आहे.

अपघाताचं नेमकं कारण स्पष्ट होऊ शकलेलं नाही. मात्र गाडीत काहीतरी तांत्रिक बिघाड झाल्यामुळे हा अपघात घडल्याची माहिती समोर येत आहे.वाहनात तांत्रिक बिघाड झाल्याने गाडी डोगंराच्या कपारीला धडकल्याने हा अपघात झाला त्यांनच्यावर पनवेल येथील एमजीएम रुग्णालयात उपचार चालू होते.
शिवसंग्राम चे नेते यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याने जिल्ह्यात आणि राज्यात एकच खळबळ उडाली आहे वयाच्या 52 व्या वर्षी त्यांची प्राणजोत मावळली आहे राजकारणात समाजकारणात आपलं नाव आणि शिवसंग्राम पक्षाच्या वतीने केलेलं कार्य संबंध महाराष्ट्र विसरू शकणार नाही असे दैदिप्यमान कार्य करणारा नेता आज सर्व समाजात एक पोकळी निर्माण करून गेला आहे अशा भावना कार्यकर्ते आणि समाजातून व्यक्त होत आहेत या घटनेने सर्वत्र शोककळा पसरली आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button