ताज्या घडामोडीमहाराष्ट्र

आ.धनंजय मुंडेंची शब्दपूर्ती; बर्दापूर येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकाचे शनिवारी भूमिपूजन

धनंजय मुंडेंची शब्दपूर्ती; बर्दापूर येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकाचे शनिवारी भूमिपूजन

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा उभारून सुशोभीकरण करण्याच्या कामास सत्तेत असताना मंजूर केला होता निधी

धनंजय मुंडे यांच्या हस्ते होणार स्मारकाचे भूमिपूजन, पूज्य भिक्खू पय्यानंदजी यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती

अंबाजोगाई (दि. 12) – राज्याच्या सामाजिक न्याय विभागाचे माजी मंत्री आ. धनंजय मुंडे यांनी बर्दापूर येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकासंदर्भात दिलेला शब्द पूर्णत्वास जात असून, बर्दापूर येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारकस्थळी पुतळा उभारुन सुशोभीकरण करण्याच्या कामाचे शनिवारी (दि. 13) सकाळी 11. 30 वा. भूमिपूजन संपन्न होणार आहे.

सामाजिक न्याय खात्याचे मंत्री असताना धनंजय मुंडे यांनी बर्दापूर व परिसरातील भीम अनुयायांच्या मागणीनुसार या कामासाठी 1 कोटी 32 लाख 70 हजार रुपये निधी उपलब्ध करून दिला होता.

या स्मारक उभारणीच्या कामाचे शनिवार दि. 13 ऑगस्ट रोजी सकाळी 11.30 वा. धनंजय मुंडे यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात येणार असून, मराठवाडा भिक्खू संघाचे सचिव पूज्य भिक्खू पय्यानंदजी हेही या कार्यक्रमास विशेष उपस्थित राहणार आहेत.

त्याचबरोबर आ. संजय भाऊ दौंड, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष ऍड. राजेश्वर चव्हाण, बजरंग बप्पा सोनवणे, माजी आ. पृथ्वीराज साठे, बहुजन विकास मोर्चाचे बाबुराव पोटभरे, वाल्मिक अण्णा कराड, राजकिशोर मोदी, गोविंदराव देशमुख, राष्ट्रवादी काँग्रेस सामाजिक न्याय सेलचे जिल्हाध्यक्ष डॉ. विनोद जगतकर, दत्ता आबा पाटील, शिवाजीराव सिरसाट, रा. कॉ. चे तालुकाध्यक्ष ताराचंद शिंदे, बबनभैय्या लोमटे, विजयकुमार गंडले, उज्जैन बनसोडे, दत्ता सरवदे, विलासकाका सोनवणे, सौ. विजयमाला ताई जगताप, व्यंकटेश चामनर, आलिशान पटेल, तानाजी देशमुख, बालासाहेब गंगणे, सुधाकर माले, राजपाल लोमटे, बर्दापूर चे सरपंच सुधाकर शिनगारे, विलासबापू मोरे, विश्वनाथ जानकर जिल्हा परिषद समाज कल्याण अधिकारी रवींद्र शिंदे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता संजय मुंडे यांसह बर्दापूरचे सर्व ग्राम पंचायत सदस्य, राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी व भीम अनुयायी उपस्थित राहणार आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button