ताज्या घडामोडी

डॉ. महेश अकोलकर  आदर्श समाजरत्न पुरस्काराने सन्मानित ; पुणे येथे केला भव्य गौरव

डॉ. महेश अकोलकर  आदर्श समाजरत्न पुरस्काराने सन्मानित ; पुणे येथे केला भव्य गौरव

अंबाजोगाई (प्रतिनिधी )

येथील डॉ.महेश अकोलकर यांना मनुष्यबळ विकास लोकसेवा अकादमीच्या वतीने आदर्श समाजरत्न पुरस्कार प्रदान झाला आहे.
येथील डॉ.महेश अकोलकर यांनी पेशवा प्रतिष्ठानच्या माध्यमातून या भागातील सामाजिक कार्यात भरीव योगदान दिल्याबद्दल पुण्यात डॉ. सानीपिना राव, पद्मश्री डॉ.विजयकुमार शहा, जेष्ठ पत्रकार शामसुंदर सोन्नर यांच्या प्रमुख उपस्थितीत आदर्श समाजरत्न पुरस्कार सन्मान चिन्ह, मानपत्र फेटा आदी देऊन प्रदान करण्यात आला

जाहिरात
जाहिरात

डॉ.अकोलकर हे पेशवा प्रतिष्ठानच्या माध्यमातून काही वर्षापासून सामाजिक क्षेत्रात कार्यरत आहेत. सामाजिक, धार्मिक क्षेत्रातही त्यांचे मोठे कार्य आहे त्यांच्या या कार्याची दखल घेऊन त्यांना हा समाजरत्न पुरस्कार जाहीर झाला असून त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button