महिलाभक्तावर अतिप्रसंग करणाऱ्या ; राष्ट्रसंत म्हणणाऱ्या एकनाथ महाराज लोमटेवर विनयभंगाचा गुन्हा दाखल
बीडच्या महिला भक्ताच्या तक्रारीवरून यरमळा पोलिसात गुन्हा दाखल

महिलाभक्तावर अतिप्रसंग करणाऱ्या ; राष्ट्रसंत म्हणणाऱ्या एकनाथ महाराज लोमटेवर विनयभंगाचा गुन्हा दाखल
बीडच्या महिला भक्ताच्या तक्रारीवरून यरमळा पोलिसात गुन्हा दाखल
बीड प्रतिनिधी –
यैसे कैसे झाले भोंदू।
कर्म। करुनि म्हणती साधू।
अंगा लाऊनीया राख।
डोळे झाकुनी करती पाप।
दावी वैराग्याच्या कळा।
भोगी विशंयचा सोहळा।
……….. तुकाम्हणे हे अवघे सोंग। तिथे कैसा पांडुरंग। तुका म्हणे सांगो किती जळो तयाची संगती।
संत परंपरेत साधू थोर जाणा असेही म्हंटले जाते मात्र असल्या एका कपटी आणि पाखंडी महाराजांमुळे अध्यात्म आणि वारकरी परंपरेला कलंक लावण्याचे आणि लागण्याचे पातक काही महाराज करत आहे तुकारामांच्या वरील अभंगा प्रमाणे हे विदूषक अध्यात्मात आणि वारकरी परंपरेला भ्रष्ट करण्याचे पातक करीत आहेत. देवावरील निष्ठा आणि परंपरेला वासनेचे गालबोट लावत आहे त्यामुळे या नितीभ्रष्ट ढोंगी महाराजांना कठोर शिक्षा द्यायला पाहिजे म्हणजे अध्यात्मिक परंपरा कायम राहील
कळंब तालुक्यातील मलकापूर येथिल देवस्थांच्या नावाने मठ उभारून भविकानाच्या भावनांशी खेळणाऱ्या आणि काही राजकीय वरदहस्त असणाऱ्या व स्वतःला राष्टीय संत म्हणवणाऱ्या एकनाथ महाराज लोमटे यांची रासलीला कृष्णलीला आज समोर आली आहे.

◆घडले असे की◆
– यापूर्वी ठेवलेल्या शरीरसंबंधांचा व्हीडिओ व्हायरल करण्याची धमकी देत एका महाराजाने बीडच्या विवाहित महिलेचा विनयभंग केल्याची घटना गुरुवारी दुपारी उस्मानाबाद जिल्ह्यातील मलकापूरच्या मठात घडलीआहे . याबाबत महिलेने दिलेल्या तक्रारीवरुन शुक्रवारी पहाटे आरोपी लोमटे महाराजावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे . बीड जिल्ह्यातील एक ३५ वर्षीय महिला उस्मानाबाद जिल्ह्यातील मलकापूर येथील एकनाथ लोमटे महाराजांची भक्त होती . २८ जुलै रोजी ती एकटीच मलकापूर येथील मठात दर्शनासाठी गेली . गुरुवारची गर्दी असल्याने भाविक मोठ्या प्रमाणात होते . त्यांचे जेवण सुरु असल्याने ही महिला झाडाखालील ओट्यावर बसली . तेव्हा एकनाथ महाराजांच्या शिष्याने तिच्याजवळ येऊन महाराजांनी खोलीत बोलाविल्याचे सांगितले . आत गेल्यानंतर महाराजांनी शरीर संबंध ठेवावे लागतील , असे सांगितले . यास विरोध केल्यानंतर व्हिडीओ क्लिप व्हायरल करण्याची धमकी देत त्यांनी महिलेचा विनयभंग केला . तेव्हा आरडाओरडा केल्यामुळे येथआलेले भक्त गण जमा झाले आणि ही भयानक बाबसमोर आली.मात्र गर्दीतून महाराजांनी पळ काढला.

पेढा दिला खायला अन … •
दर्शनासाठी खोलीत गेल्यानंतर एकनाथ महाराजांनी या महिलेस शरीरसंबंधाची विचारणा केली . त्यास नकार दिल्यानंतर महाराजांनी मागच्या वेळी पेढा खायला दिल्यानंतर तु झोपली होती , तेव्हा आपण तुझ्यावर बलात्कार केला व त्याचा व्हीडिओही तयार केल्याचे सांगितले . हाच व्हीडिओ व्हायरल करण्याची धमकी महाराजाने दिल्याचे महिलेने तक्रारीत म्हटले आहे.
या प्रकरणी कलम 354,354 अ, 341,323,504 व 506 नुसार येरमाळा पोलिसात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या महाराजांविरोधात आधीदेखील अनेक फुसवणुकीच्या तक्रारी आहेत. मात्र राजकीय वरदहस्त असल्यामुळे त्यांच्याविरोधात फार कारवाया झालेल्या नाहीत अशी प्राथमिक माहिती आहे.