ताज्या घडामोडी

बीड जिल्ह्यासाठी स्थानिक सुट्ट्या जाहीर

बीड जिल्ह्यासाठी स्थानिक सुट्ट्या जाहीर

जाहिरात

             बीड, दि. 28  : सन 2022 या वर्षाकरिता बीड जिल्ह्यासाठी 2 स्थानिक सुट्ट्या जिल्हाधिकारी राधाबिनोद शर्मा यांनी जाहीर केल्या आहेत. त्यानुसार शुक्रवार, दि. 26 ऑगस्ट 2022  पोळा सणानिमित्त व मंगळवार, दि. 29 नोव्हेंबर 2022 चंपाषष्ठीनिमित्त अशा दोन स्थानिक सुट्ट्या जाहीर करण्यात आल्या आहेत.

            या स्थानिक सुट्ट्या राज्य न्यायालयाच्या अधिकार कक्षेतील कार्यालये, केंद्रीय प्रशासनातील कार्यालये व बँकेच्या कक्षेतील कार्यालयांखेरीज बीड जिल्ह्यातील सर्व शासकीय कार्यालये, जिल्हा परिषदेच्या कक्षेतील कार्यालये, स्थानिक स्वराज्य संस्थेची कार्यालये, जिल्ह्यातील शासकीय कोषागारे, महामंडळाची कार्यालये व इतर सर्व खाजगी शैक्षणिक संस्था यांना लागू राहणार आहेत, असे जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत प्रसिध्दीपत्रकाव्दारे कळविले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button