ताज्या घडामोडी

बीड – माजलगावची रात्रीची बस सुरू करण्याची मागणी

बीड – माजलगावची रात्रीची बस सुरू करण्याची मागणी

 

रात्री नऊची बीड- माजलगाव बस पुन्हा सुरू करा

माजलगाव – मागील २५ वर्षांपासून बीड- माजलगाव व गेवराई – माजलगाव बससेवा सुरळीतपणे रात्री ९ वाजता सुरू होती . त्यामुळे या बसला चांगला प्रतिसादही मिळत होता . बीडवरून माजलगावला येणाऱ्या शासकीय व खासगी नोकरी करणाऱ्यांना रात्री ९ वाजेच्या बससेवेचा आधार होता . २५ वर्षे सतत चालू असणाऱ्या या बसला कोरोना काळामध्ये ‘ ब्रेक ‘ लागला . अनेक कोरोनानंतरही बस बंदच राहिली . त्यामुळे रात्री उशिरा येणा – जाणारे कर्मचारी तसेच इतर प्रवाशांची खूप मोठ्याप्रमाणात हेळसांड होत असल्याचे अनेकवेळा कर्मचारी , प्रवाशांनी माजलगाव आगाराला कळविले . कर्मचारी व प्रवाशांची होत असणारी हेळसांड तत्काळ थांबविण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते मनोज फरके यांनी विभाग नियंत्रक अजयकुमार मोरे यांना निवेदन देऊन लवकरात लवकर ही बससेवा चालू करण्याची मागणी केली , यावेळी विभाग नियंत्रक मोरे यांनी योग्य कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले .

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button