कृषीवार्ता

राजुरीचा गजानन होतोय सुरू;ऊस उत्पादकांना संजीवनी

अतिरिक्त उसाचा प्रश्न मिटणार

गजानन’ होतोय सुरू,ऊस उत्पादकांना संजिवनी
राज्य बॅंकेकडून देण्यात आला प्रत्यक्ष ताबा

बीड (प्रतिनिधी):- अनेक वर्षांपासून बंद असलेला गजानन सहकारी साखर कारखाना पुन्हा सुरू होत असून ही जिल्ह्यातील शेतकर्‍यांसह रोजगाराची वाट पाहणार्‍या कष्टकर्‍यांसाठी अतिशय आनंदाची बातमी आहे.गजानन सहकारी साखर कारखान्याच्या माध्यमातून बीड विधानसभा मतदारसंघातील बीड व शिरूर-कासार तालुक्यासह जिल्हाभरातील ऊस उत्पादकांना संजिवनी मिळणार आहे.

जाहिरात
जाहिरात

जिल्ह्यात दरवर्षी ऊस उत्पादक शेतकर्‍यांसमोर अतिरिक्त ऊसाचा गंभीर प्रश्न उभा राहतो. परंतु जिल्ह्यातील मोठी गाळप क्षमता असलेला गजानन सहकारी साखर कारखाना सुरू होत असल्याने ऊस उत्पादक शेतकर्‍यांसमोरील ऊस उत्पादनाचा रस्ता सुकर झाला आहे. गुरूवार दि.28 जुलै 2022 रोजी गजानन सहकारी साखर कारखाना लि.सोनाजीनगर,नवगण राजुरी ता.बीड येथे येवून राज्य बँकेचे प्राधिकृत अधिकारी श्री.खेडेकर यांनी गजानन सहकारी साखर कारखाना, प्रत्यक्षरित्या कारखान्याचे चेअरमन रविंद्र दादा क्षीरसागर, डी.व्ही.पी.कमोडीटी एक्सपोर्ट प्रा.लि.कंपनीच्या डायरेक्टर

जाहिरात

सौ.नेहाताई संदीप क्षीरसागर, डायरेक्टर अमर धनंजय पाटील यांच्या ताब्यात दिला.बीड विधानसभा मतदारसंघातील बीड व शिरूर-कासार तालुक्यासह जिल्हाभरातील जिल्ह्यातील शेतकर्‍यांच्या सेवेत गजानन कारखान्याची चिमणी लवकरच पेटलेली दिसणार आहे. दरम्यान यावेळी गजानन सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन रविंद्र दादा क्षीरसागर,आ.संदीप क्षीरसागर, डी.व्ही.पी. कमोडीटी एक्सपोर्ट प्रा. लि. कंपनीचे संचालक, अधिकारी-कर्मचारी, महंत अमृतदास जोशी महाराज, मा.आ. सय्यद सलीम साहेब,मा.आ.सुनिल दादा धांडे, वैजिनाथ नाना तांदळे, राज्य बँकेचे अधिकारी यांच्यासह पंचक्रोशीतील शेतकरी बांधव, ग्रामस्थ आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button