आरोग्य व शिक्षणताज्या घडामोडीमहाराष्ट्र

ऊसतोड मजुरांच्या पल्यासाठी हंगामी वसतिगृह चालकांचे परत गेलेले 10 कोटी खात्यावर जमा


ऊसतोड हंगामी वसतिगृह

बीड : ऊसतोड कामगारांच्या पाल्यासाठी केंद्र आणि राज्य शासनाच्या समग्र शिक्षा अभियान अंतर्गत हंगामी वसतिगृह हा महत्त्वपूर्ण उपक्रम राबविला जात असून बीड जिल्ह्यातील स्थलांतरित होणा – या ऊसतोड मजुरांच्या पाल्यासाठी सन २०२१ – २२ मध्ये जिल्ह्यातील ४०३ हंगामी वसतिगृह प्रस्तावित करण्यात आले होते यातील २६८ हंगामी वसतिगृह प्रत्यक्षात सुरू करण्यात आले होते सदरील वसतिगृहात २३ ९ ३८ विद्यार्थ्यांनी लाभ घेतला आहे . दोन दिवसात पैसे खात्यावर जमा होणार असल्यामुळे वसतिगृह चालकांनी सुटकेचा निश्वास सोडला असुन जिल्हापरीषद मधिल शिक्षण विभागाचे उंबरठे झिजवणे बंद होणार आहे . अनुदानाची पीएफएमएस प्रणालीकडे शिक्षण विभागाने दुर्लक्ष केल्यामुळे निधी परत ; आंदोलनानंतर पाठपुराव्यानंतर निधी परत_ सर्व शिक्षा अभियान अंतर्गत मिळणारे अनुदान पीएफएमएस या स्वयंचलित प्रणालीमुळे निधी वितरीत करण्याची नविन पद्धत सुरू केल्यानंतर २ ९ , ३० , ३१ मार्च दरम्यान पीएफएमएस प्रणालीच्या साईटवर तांत्रिक अडचणी निर्माण झाल्यामुळे तसेच प्रकीयेकडे बीड जिल्ह्यातील शिक्षण विभाग दुर्लक्ष केल्यामुळे सर्वशिक्षा अभियानचे १३ कोटी रूपये परत गेले होते त्यात ऊसतोड मजुरांच्या पाल्यासाठी केंद्र आणि राज्य शासनाच्या समग्र शिक्षा अभियान अंतर्गत वसतिगृह चालकांचे १० कोटी ३१ लाख रूपये थकीत होते याअनुषंगाने डॉ . गणेश ढवळे लिंबागणेशकर यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एकदिवसीय लाक्षणिक धरणे आंदोलन करण्यात आले होते तसेच सतत पाठपुरावा सुरूच होता त्यानंतर शिक्षण विभागाने याचा योग्य रीत्या पाठपुरावा केल्यानंतर दोन दिवसात पैसे वसतिगृह चालकांच्या खात्यावर जमा होणार असल्याची माहीती उपशिक्षणाधिकारी अजय बहिर यांनी दिली .

टीप

*ताज्या बातम्यांचे दररोज अपडेट साठी आमचा व्हाटअप ग्रुप ज्याईन करा*
https://chat.whatsapp.com/HVQnDnMXqYU5M8mq6KTc1M

*ताज्या बातम्या साठी टेलिग्राम ज्याईन करा*
https://t.me/rahatkrantinews
*जाहिरात बातम्यांसाठी संपर्क-8551005741*

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button