आरोग्य व शिक्षणमहाराष्ट्र

भोगलवाडी शाळेतील शिक्षकांनी दिली शाळेला विविध वस्तुंची भेट; पालकांकडून स्वागत    

भोगलवाडी शाळेतील शिक्षकांनी दिली शाळेला विविध वस्तुंची भेट; पालकांकडून स्वागत

  अर्जुन मुंडे

धारूर-  भोगलवाडी  येथील जि.प.माध्यमिक शाळेच्या मुख्याध्यापक व शिक्षकांनी या शाळेला फॅन, कचराकुंडी यासह इतर  आवश्यक वस्तुंची भेट दिली.शिक्षकांच्या या कार्याचे पालक वर्गाने अभिनंदन केले आहे.

जाहिरात
जाहिरात
           धारूर तालुक्यातील भोगलवाडी येथे जि.प.ची इतर.पहिली ते इतर.दहावी पर्यंतची शाळा आहे.यंदा शाळा चालु झाल्यानंतर पहिल्याच महिन्यात जि प.माध्यमिक शिक्षणाधिकारी श्रीकांत कुलकर्णी, उपशिक्षणाधिकारी कराड आदिंनी दि.१५जुलै रोजी अचानक भेट देऊन, शाळेच्या कामकाजाचा आढावा घेत शाळा वर्ग खोल्यांची तपासणी केली.यावेळी त्यांना कांही सोयीसुविधांचा अभाव निर्दशनास आल्याने त्यात शाळेच्या मुख्याध्यापक व शिक्षकांनी सुधारणा करण्याचे आदेश शिक्षणाधिकारी यांनी दिले होते.

जाहिरात

यावर शाळेतील मुख्याध्यापक व इतर सर्व शिक्षकांच्या बैठकीत शाळेसाठी,विद्यार्थ्यांसाठी त्या सुविधा उपलब्ध करून देण्याचे ठरविण्यात आले.तसेच यासाठी लागणारा आर्थिक खर्च सर्व शिक्षकांनी वर्गणी करून करण्याचे ठरले.त्याप्रमाणे मुख्याध्यापक व शिक्षकांनी जमा केलेल्या रकमेतुन शाळेच्या प्रत्येक वर्ग खोलीसाठी फॅन, कचराकुंडी यासह इतर आवश्यक वस्तु खरेदी केल्या. सदर वस्तु एका छोटेखानी कार्यक्रमात जो.प.सदस्या सौ.भारतीताई तिडके, शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष लालासाहेब तिडके यांच्या प्रमुख उपस्थितीत शाळेस देण्यात आल्या.कार्यक्रमास मुख्याध्यापिका एच.एस. साळुंके मॅडम यांच्यासह गावातील शिक्षणप्रेमी नागरिक उपस्थित होते.भोगलवाडी शाळेच्या मुख्याध्यापिका व शिक्षक यांनी शिक्षणाधिकारी यांनी केलेल्या सुचनांचे कांही दिवसातच पालन करत विद्यार्थ्यांना ज्ञानार्जन करताना उष्णतेचा ञास होऊ नये म्हणुन प्रत्येक वर्गात फॅन तर वर्गात व शाळेच्या परिसरात कचरा होऊन परिसरात घाण होऊ नये म्हणुन कचराकुंडी शाळेला भेट देऊन तालुक्यात एक आदर्शवत उदाहरण निर्माण केले.याबद्दल भोगलवाडी येथील शिक्षणप्रेमी नागरिक व पालकांनी मुख्याध्यापिका साळुंके मॅडम व शिक्षक यांचे अभिनंदन करत शाळेच्या विकासासाठी आम्ही कायम सोबत राहु असे म्हटले. सदरील कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मुख्याध्यापिका साळुंके मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली एम.जी.मुंडे, व्हि.जे. बडे, एस.एस.बडे, जी.एम.घुगे मॅडम, एल.व्हि.तिडके, एस.एन.कांडनगिरे, एच.एच.लांब,व्हि. डी.मरेवार, ए.ए.नाईकवाडे ,जाधव बाई आदिंनी परिश्रम घेतले.

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button